अमेरिकींना भारतात न जाण्याचा सल्ला

वॉशिंग्टन वृत्तसंथा । भारतासोबत चांगली घट्ट मैत्री असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकी सरकारने त्यांच्या नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोनाचे वाढते संकट, गुन्हेगारी आणि दहशतवादामुळे भारतात प्रवास न करण्याचा अमेरिकेने आपल्या नागरिकांना म्हटले. धक्कादायक म्हणजे अमेरिकेने भारताला सीरिया, पाकिस्तान, इराक, येमेन या देशांच्या श्रेणीत स्थान दिले आहे.

अमेरिकेने भारताला चार इतकी रेटिंग दिली आहे. ही रेटिंग वाईट असल्याचे म्हटले जाते. अमेरिकेने सांगितले की, भारतात कोरोनाचे संकट आहे. त्याशिवाय देशात गु्न्हेगारीच्या घटना आणि दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे.

अमेरिकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही ठिकाणी महिलांवरील वाढत्या अत्याचाराचेही कारण दिले आहे. इंडियन टूरिझम अॅण्ड हॉस्पिटलटी संघाने केंद्र सरकारकडे अमेरिकेची ही भूमिका बदलण्यासाठी अमेरिकेवर दबाव टाकावा अशी विनंती केली आहे.

 

Claiming, good friendship with India, the US government, advised its citizens not to travel to India.

 

Protected Content