‘कोरोना’च्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सोळा डॉक्‍टरांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर होत असतांना जिल्हा कोवीड रूग्णालयात कोरोनाबाधित ८२ वर्षीय आजीचा मृतदेह तब्बल आठ दिवसांची शौचालयात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणात बेजबाबदार डीन डॉ. खैरे यांच्यासह दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी राज्याच्या वैद्यकिय संचालनालयाने सुमारे १७ डॉक्टरांची जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयात नियुक्ती केली आहे. तर रिक्त झालेल्या प्रभारी डीनपदी धुळे महाविद्यालयाचे डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी आदेश दिला आहे. डीनपदी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाचे डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.

सोळा डॉक्‍टरांची नियुक्ती
डीन यांच्या नियुक्तीसोबतच “कोरोना’च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सोळा डॉक्‍टरांची नियुक्ती केली आहे. डॉ.अरूण हुमणे (चंद्रपूर), डॉ. मधुकर गायकवाड (मुबंई), डॉ. भारत चव्हाण (अहमदनगर), डॉ. व्यंकटेश जोशी (लातूर), डॉ. श्‍याम तोष्णीवाल ( लातूर), डॉ. उदय जोशी (अंबाजोगाई), डॉ. देवानंद पवार (आंबेजोगाई), डॉ. अतुल गारजे (लातूर), डॉ. मृदूल पाटील (लातूर), डॉ. रणजीत एस. (लातूर), डॉ. किरण माळी (लातूर), डॉ. प्रविण बोदेवार (आंबेजोगाई), डॉ. मोहित खरे (नागपूर), डॉ. प्रवीण पवार (नागपूर), डॉ. महेश चावट (नागपूर), डॉ. शशांक मोडक (नागपूर) यांची जळगाव येथे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

Protected Content