कुत्र्याला हटकल्याचा कारणावरून शाहू नगरात तरूणाला चौघांकडून बेदम मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कामावर घरी परतणार्‍या तरुणाने कुत्र्याला हटकल्याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ करीत तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवार ९ मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील शाहूनगरातील ताज पान सेंटर जवळील रहिवासी शेख वसीम शेख मुसा (वय-३०) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. प्लंबरचे  काम करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी ७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शेख वसीम हा कामावरुन घरी जात असतांना पाळीव कुत्रा शेख वसीम यांच्या अंगावर भुंकला होता. दरम्यान, शेख वसीम यांनी त्याला हटकले असता, त्याचा राग आल्याने सरदार तडवी रा. आदीवासी हाऊस शाहूनगर याने शेख वसीम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून सरदार तडवीचे दोघ भाऊ नामदार तडवी व रहीम तडवी व जम्बो तडवी हे तिघे त्याठिकाणी आले. यावेळी सरदार तडवी यांनी त्यांच्या हातातील टेन्टा हाऊसचा लोखंडी दांडा शेख वसीम यांच्या डोक्यात हाणला. तर जम्बो तडवी आणि रहिम तडवी , नामदार तडवी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

जखमी झालेल्या शेख वसीम याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात शेख वसीम याच्या फिर्यादीवरून बुधवार ९ मार्च रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी सरदार तडवी, नामदार तडवी, जम्बो तडवी, रहिम तडवी सर्व रा. आदिवासी हाऊस शाहुनगर यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content