कोरोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात ; अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा दावा

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) कोरोनाचे विषाणू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतात असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. यामुळे उन्हाळ्यात कोरोनाचा फैलाव कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

 

सूर्याची किरणं जमीन आणि हवेत दोन्हीकडे विषाणूंचा खात्मा करत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. तापमान आणि आर्द्रता अशा दोन्ही वेळेला आम्ही पाहणी केली असता तोच परिणाम होत असल्याचं आमच्या लक्षात आले आहे. तापमान आणि आर्द्रता वाढवणं करोनाच्या विषाणूंसाठी कमी अनुकूल आहे, अशी माहिती होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी विभागाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार विल्यम ब्रायन यांनी दिली आहे. सरकारी शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विषाणूंवर परिणाम होत असल्याचा शोध लावला आहे. मात्र हा रिसर्च अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. दरम्यान, नव्या संशोधनानुसार, व्हायरस थंड आणि कोरड्या वातावरणात जास्त काळ टिकतो. तर दुसरकीडे उबदार आणि आर्द्रता असलेल्या वातावरण कमी वेळ टिकतो, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

Protected Content