जळगाव, प्रतिनिधी । कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे जे काही रुग्ण मृत्यू होत आहे त्याच्यातले जळगाव, अमळनेर चोपडा, भुसावळ, धरणगाव येथील काही डेड बॉडी रात्री १२ व १ वाजता देण्यात आल्या व त्यांचा दफनविधी तेवढ्या रात्री जळगाव शहरातील कब्रस्तान मध्ये करण्यात आला. यासंदर्भात कब्रस्थान ट्रस्टने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे मानद सचिव फारुक शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सात मागण्यांचे निवेदन दिले. त्यात प्रामुख्याने कोरोना पॉझिटिव्ह अथवा संशयित डेड बॉडी ही फक्त सिविल हॉस्पिटल अथवा मनपाच्या शववाहिका मधूनच आणण्यात यावी, दफन विधीसाठी प्रत्येक दफनविधी ला प्रतेकि ३ पीपीई किट देण्यात यावे, शव वाहिके वरील चालकाला सुद्धा पीपीई किट देण्यात यावे, रात्री १० वाजेनंतर जो रुग्ण मृत्यूमुखी पडेल त्याची डेड बॉडी सकाळी ताब्यात देण्यात यावी. त्याचा दफनविधी सकाळी करण्यात येईल. शक्यतो ज्या गावाची डेड बॉडी आहे त्या गावातच ती पाठविण्यात यावी. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना संबंधित पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे घाबरतात अथवा अप्रत्यक्षपणे थांबवतात त्यावर पोलीस अधीक्षकांनी योग्य ते नियंत्रण आणावे. मनपा डॉक्टर रावलनी हे मयत रुग्णाच्या नातेवाईकांना डायरेक धमकी देतात की अंत्यविधीला गेला तर तुला मी चौदा दिवस क्वारंटाईन करेलअशी धमकी देतात ते बंद होणे आवश्यक आहे. यानंतर या सर्व बाबीं बाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरित जिल्हा शल्य चिकित्सक व आयुक्त मनपा जळगाव यांना लागलीच दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या व या मागण्यांची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात यावी असे मौखिक आदेश दिले.