कोरपावली येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

 

यावल :  प्रतिनिधी ।  तालुक्यातील कोरपावली येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फौंडेशन ,कोरपावली व महेलखेडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

 

 

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस सेवा फौंडेशनचे प्रदेशाध्यक्ष ॲड. शुभाषचन्द्र गोडसे यांनी केनेल्याआवाहनास प्रतिसाद  देत  जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप  पाटील, आमदार शिरीष चौधरी ,जिल्हा परिषद गटनेते तथा यावल तालुका काँग्रेस  अध्यक्ष  प्रभाकर  सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली  हे  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून रक्तदान शिबीराची सुरवात करण्यात आली रक्तदान शिबिराचे उदघाटन सरपंच विलास अडकमोल यांनी स्वतः  रक्तदान करून केले .  काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल,जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी जावरे, उपसरपंच हमीदाबी पटेल, माहेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी, उपसरपंच सौ .माया महाजन, काँग्रेस सेवा फौंडेशनचे यावल तालुका मिडियाप्रमुख विक्की पाटील,  मुक्तार पटेल, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, पराग महाजन, जयंता महाजन, ग्रा प सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी , अमोल नेहेते, सिकंदर तडवी, जुंमा तडवी, प्रवीण अडकमोल, जयवंत अडकमोल, भीमराव इंधटे, आशा वर्कर हिराबाई पांडव, नजमा तडवी, अंगणवाडी सेविका अलका महाजन, निशा तडवी, मालती नेहेते, लता अडकमोल, ग्रा प कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी यांनी सहकार्य केले

 

रेडप्लस ब्लड बँकेचे डॉ. भरत गायकवाड, डॉ. अमोल शेलार, डॉ. रविंद पाटील, डॉ. सलमान पटेल आदींनी तपासणी करून रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला .

Protected Content