यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्राम पंचायत अंतर्गत १५ व्या वित्तआयोग निधीतून विविध विकासकामांसाह पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामास मान्यवरांच्या उपस्थितीत भुमीपुजन करीत सुरुवात करण्यात आली आहे.
कोरपावली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील वार्ड. क्र. ३ आणि ४ मध्ये कंबायीन जुने पोस्टऑफिस पासून संजय सोमा नेहेते यांच्या घरापर्यंत पेव्हरब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन आज लोहपुरुष स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोळंबे आणि नेहेते वड्यात उपसरपंच हमिदाबी पिरण पटेल आणि त्या वॉर्डातील महिला बघिनी मंगला कोळंबे, रेखाताई महाजन, लतिकाताई कोळंबे, ज्योती महाजन, रजनी महाजन या सर्व महीला यांच्या हस्ते पूजन करून व नारळ फोडून विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी पोलिस पाटील दत्तात्रय महाजन,प्रगतशील शेतकरी पिरण पटेल, सेवानिवृत्त पोस्टमास्टर अशोक कोळंबे, निवृत्त शिक्षक सुकलाल नेहेते प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला माजी सरपंच व विद्यमान सदस्या कविता तुळशीदास कोळंबे ग्राम पंचायत सदस्य अफरोज पटेल, ग्राम पंचायत सदस्या भारती नेहेते, माजी सरपंच जलील पटेल,माजी सरपंच महेंद्रआप्पा नेहेते, मुक्तार पटेल, माजी उपसपंच अब्दुल तडवी, एस.के. नेहेते, गोविंदा कोळंबे, वंदीप कोळंबे, नारायण कोळंबे,शिवाजी नेहेते, विकास सोसायटीचे संचालक इम्रान पटेल, रवींद्र पाटील, हेमंत फेगडे, हरीश नेहेते, अन्सार अफरोज पटेल, अनस पटेल, युगल पाटील, अन्सार सलाम पटेल, शकील पटेल सह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यमान सरपंच विलास अडकमोल यांची गावाच्या विकास कामांच्या कार्यक्रमास अनुपस्थिती मात्र लक्ष वेधणारी ठरली. यामुळे ग्रामस्थांमध्ये वेगवेगळी तर्कविर्तक काढण्यात येत आहे.