यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली गावात मागील आठवडयात दोघांचा अहवाल पॅझिटिव्ह आल्याने प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना आसैनिक अल्बम ३० या रोगप्रतिकारकशक्तीचे वाटप करण्यात आले.
कोरपावली गावात माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जलील पटेल यांच्या प्रभाग क्रमांक ४ मधील कंटेमेन्ट झोन असलेल्या नेहेते वाडा परिसर येथील २० कुटुंबातील सुमारे ७६ लोकांना आसैनिक अल्बम ३० या रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गोळ्यांचे वाटप करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यात थर्मामिटर मशीनने टेम्परेचर तपासणी केली. नागरीकांना सॅनिटायझर आणि मास्क सुद्धा वाटप करण्यात आले. प्रतिबंधीत परिसराचे निर्जतुकीकरणं करून फवारणी करण्यात आली. त्या लोकांना घरात रहा सुरक्षीत रहा व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची विनंती करण्यात आली. महाराष्ट्र शासन आणि ग्राम पंचायत प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काही लक्षण दिसल्यास आम्हाला लगेच कळवा अशा सुचना करण्यात आल्या. यावेळी कोरपावली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सदस्य जलील पटेल, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, पोलीस पाटील सलीम तडवी, इस्माईल तडवी, तुळशीदास कोलंबे, ग्रा.प. सदस्य राजेंद्र पाटील, आशा वर्कर हिराबाई पांडव, हसीना तडवी, नजमा तडवी, स्वयंसेवक जावेद पटेल, इसाक पटेल, सादिक पटेल, ग्रा.प. कर्मचारी किसन तायडे आदी उपस्थित होते.