Home Cities यावल कासवा शिवारात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त; एकावर गुन्हा

कासवा शिवारात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त; एकावर गुन्हा

0
140

aizpur news

फैजपूर प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या कासवा शिवारातील शेतात गावठी हातभट्टी फैजपूर पोलीसांनी उद्ध्वस्त केली. याप्रकरणी एकावर फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फैजपूर येथून जवळ असलेल्या कासवा शेत शिवारात संशयित आरोपी सोपान सुरेश कोळी रा. कासवा ता. यावल हो अवैधरित्या शेतात गावठी दारू बनवित असल्याची माहिती फैजपूर पोलीसात मिळाली. त्यानुसार सपोनि वानखेड, पोउनि सांगळे, पोहेकॉ सुधाकर पाटील, पो.ना. किरण चाटे, पो.कॉ. चिरमाडे आणि पो.कॉ. पवार यानी घटनास्थळी छापा टाकला. पोलीस येत असल्याचा सुगावा संशयित आरोपी सोपान कोळी याला लागताच तेथून फरार झाला. यावेळी12 हजार 600 रूपये किंमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली तर अन्य रसायने नष्ट करण्यात आली. याप्रकरणी फैजपूर पोलीसात पो.कॉ प्रशांत चिरमाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोपान कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वानखेड करीत आहे.


Protected Content

Play sound