भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ येथे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.
कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून कोटेचा महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी संगीत खुर्ची, दहीहंडी फोडणे असे कार्यक्रम सादर करून गोकुळाष्टमी जल्लोसात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा यांनी दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
विद्यार्थिनीची संवाद साधताना त्यांनी प्रतिपादन केले की, आपण सर्व विद्यार्थिनींनी समाजात सामाजिक सलोखा जपून त्याद्वारे बंधुता व एकता जोपासणे खूप गरजेचे आहे आणि तुम्ही सावित्रीच्या लेकी समाजात बंधुभाव नक्की निर्माण कराल अशी मला खात्री आहे.
या कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या वेशभूषेत कल्याणी पाटील आणि राधेच्या वेशभूषेत मेघना भारद्वाज व गोपिकेच्या भूमिकेमध्ये नयना सपकाळे, पूजा हडपे, हर्षा तायडे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिपाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. निलेश गुरचल, प्रा. सचिन पंडित प्रा.सुरज हेडा डॉ. गिरीश कोळी प्रा.विनोद भालेराव प्रा. गिरीश सरोदे मनिषा इंगळे केले. आभार कल्याणी पाटील या विद्यार्थिनीने मानले.