जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील गेंदलाल परिसरात सेवादल यंग ब्रिगेडचे शहर अध्यक्ष गोकुळ चव्हाण यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष शाम तायडे, गोकुळ चव्हाण, सुधीर पाटील, प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, विश्वास सपकाळे, जाकीर बागवान, संतोष गायकवाड, योगिता शुक्ल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते