जळगाव प्रतिनिधी । के. सी. ई. सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे २० रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
महाष्ट्रातील सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राज्यमंत्री महोदय (उच्च व तंत्र शिक्षण) व संचालक रासेयो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आवाहनानुसार या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन के.सी.ई. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीपकुमार केदार यांनी रक्तदान करून केले. सदर शिबीर माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. या प्रसंगी १८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक अंतर ठेवणे, शरीराचे तापमान तपासणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता ठेवणे आदी दक्षता घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा. निलेश जोशी, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कोल्हे, डॉ. गणेश पाटील, मनिष वनकर, संजय जुमनाके, मोहन चौधरी, निलेश नाईक, विजय चव्हाण, विनोद पाटील, मेहमूद तडवी यांचे सहकार्य लाभले.