किरकोळ कारणावरून तरूणाला लोखंडी सळईने मारहाण; दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उजाड कुसुंबा येथे पत्र्याचे पाणी घरावर पडल्याच्या कारणावरून तरूणाला लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद शब्बीर तडवी (वय-३५) रा. उजाड कुसुंबा ता.जि.जळगाव हा तरूण चालक असून मिळेल त्या खासगी गाडीवर काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान, शनिवारी १५ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास  शेजारी राहणारे नमीन शरीफ तडवी यांनी त्यांच्या घराच्या पत्र्यावरील पाणी विनोद तडवी यांच्या घरावर पडले. याचा जाब विचारला असता नमीर शरीफ तडवी आणि त्याचा भाऊ सोनु शरीफ तडवी यांनी लोखंडी आसारीने विनोद तडवी मारहाण केली व डोक्याला दुखापत झाली. यात विनोद जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. विनोद तडवी याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष पवार करीत आहे. 

 

Protected Content