चोपडा येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

चोपडा प्रतिनिधी ।शहरातील गुरूकूल नगरातू १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

१३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहेते. १४ मे रोजी ८.३० मुलगी घरी असतांना अज्ञात व्यक्तीने घरात कुणीही नसतांना  अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून पळून गेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. हा प्रकार पीडीत मुलीच्या आईला समजला असता तिने नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीकडे शोधाशोध केली असता मुलगी मिळून आली नाही. अखेर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोलीस नाईक संतोष पारधी करीत आहे. 

Protected Content