केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विभागातील पदविका संगणक अभियांत्रिकी शाखेतर्फे ऑनलाईन कार्यशाळा  

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या स्पोकन ट्युटोरिअल अंतर्गत विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत व्दितीय आणि तिसऱ्या वर्षाच्या संगणक आणि विद्युत पदविका अभियांत्रिकीचा विद्यार्थ्यांसाठी दि. 19 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट २०२२ या कालावधीत c आणि c++ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत व आय आय टी मुंबईच्या संयुंक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करून सॉफ्टवेअरची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन विद्युत पदविका अभियांत्रिकीचे 33 आणि संगणक अभियांत्रिकीचे १९२, एकूण २२५ विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांनी ओपन फ्री सॉफ्टवेअरचा उपयोग जास्तीत जास्त करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी, प्रा. संजय दहाड, प्रा. डॉ. प्रज्ञा विखार, च्या मार्गदर्शनाखाली संगणक विभाग प्रमुख काजल विसराणी, विद्युत विभागप्रमुख प्रा. जगदीश पाटील यांचे सहकार्य लाभले. एफओएसएस सेन्टरचे को ओर्डीनेटर प्रा. अविनाश सूर्यवंशी, वर्कशॉप को ओर्डीनेटर प्रा. काजल विसराणी यांनी ऑनलाईन कार्यशाळेचे व्यवस्थापन केले.

Protected Content