केसीईत शिक्षकांसाठी ‘ऑनलाईन टीचिंग लर्निंग’वर दोन दिवसीय कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटीतर्फे सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त टीचिंग लर्निंग सेंटर आयआयटी मद्रास, अप स्किल्स यांच्या मार्फत शिक्षकांसाठी ऑनलाईन टीचिंग लर्निंग या विषयावर १९ व २० सप्टेंबर रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सद्यपरिस्थिती अनुसार विद्यार्थी व शिक्षक यांच्यात सुसंवाद उत्तम रित्या व प्रभावीपणे करता यावा तसेच ऑनलाइन टिचिंग करताना शिक्षकांना येणाऱ्या समस्या कशाप्रकारे सोडविता येतील यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ज्यामध्ये ‘लाइव्ह टिचिंग सेशन घेताना कोण कोणत्या टूल्स’चा समावेश करावा तसेच ऑनलाइन सेशन घेताना डॉक्युमेंटेशन कशा प्रकारे वापरावे. विद्यार्थ्यांना असाइनमेंट कशा पद्धतीने देण्यात याव्यात. असेसमेंट कशा पद्धतीची निवडावी. स्प्रेडशीट कशा पद्धतीने डाऊनलोड करावी ती फिल्टर कशाप्रकारे करावी व सेव कोठे करावी याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यात आली. शिक्षकांनी आपल्या ऑनलाइन सेशन मध्ये गूगल शीट, एक्सेल शीट कशा पद्धतीने वापरावेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या डिवाइस मध्ये फाईल्स कमी कमीत जागेत कशा पद्धतीने सेव करून स्टोअर कराव्यात. त्या विद्यार्थ्यांना कशा तऱ्हेने शेअर कराव्यात गुगल ड्राइव्हचा वापर कशा प्रकारे करावा याबाबत तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी के.सी.ई.सोसायटीच्या ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Protected Content