केळी उत्पादकांच्या मागण्यांसाठी जिल्हाभर आंदोलनाचा इशारा

 

जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसह अन्य शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मागण्यांकडे आठवडाभरात लक्ष न दिल्यास ९ नोव्हेंबर रोजी आणि त्यापुढेही जिल्हाभर विविध प्रकारे आंदोलने करण्यात येतील असा इशारा दिला

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना हे निवेदन देताना खासदार रक्षाताई खडसे , खासदार उन्मेष पाटील , भाजप जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे , माजी मंत्री आ. गिरीश महाजन , आ. चंदुलाल पटेल , आ. मंगेश चव्हाण , जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .

निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री आ. गिरीश महाजन म्हणाले कि , केळी पिकाच्या विमा भरपाईचे निकष बदलण्याची आमची मुख्य मागणी आहे पाच वर्षापूर्वीचे निकष कायम ठेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळावी . ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे कि विमा कंपन्यांच्या? , त्यातून लाभ सरकार त्यांच्या मंत्र्यांना देणार आहे का? , शेतकऱ्यांना अशाने एक रुपयाही मिळणार नसेल तर काय करायचे ?. उगाच केंद्र सरकारने असे केले , तसे केले असे म्हणत राज्य सरकारला हात झटकता येणार नाहीत . अन्यथा ९ तारखेपासून जिल्ह्यात रास्ता रोकोसह विविध आंदोलने करण्यात येतील . या विमा योजनेतील भरपाईची रक्कम पूर्वी २५ हजार होती ती आता ७ हजारावर का आणली ?, गेल्यावर्षी सरकारने मका , धान , तूर , हरभरा खरेदी केलेली नाही . अजूनही यंदा सरकार खरेदीच्या मनस्थितीत दिसत नाही . त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होते आहे .

अन्य एक प्रश्नाच्या उत्तरात माजी मंत्री आ. गिरीश महाजन म्हणाले कि , राज्यात वीज प्रश्न गंभीर आहे . ३-३ महिने शेतकर्यांना ट्रान्स्फार्मर मिळत नाही . आमदार फंडातून ऑइलसाठी पैसे द्या म्हणत आहेत . शेतकऱ्यांना वार्यावर सोडलेले आहे ते फक्त राजकारणात दंग आहेत .

काही राजकीय मुद्द्यांवर बोलताना ते म्हणाले कि , महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी कुणाची शिफारस केली जाईल त्याच्याशी भाजपला काही देणेघेणे नाही सरकारकडून यादी गेल्यावर राज्यपाल त्यांचा निर्णय घेतील . जिल्ह्यातील घडामोडींबद्दल त्यांनी सांगितले कि , आमच्या कार्यकर्त्यांची काळजी करू नका . पक्षाशी बांधील आमचे कार्यकर्ते आहेत . काही हौसे – नवसे गेलेही असतील पण पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी कुणी गेले का हे तुम्हीच सांगा ?, माझ्या मागे एवढे लोक आहेत असे म्हणण्याचा राजकीय स्टंट असतो . कुठे आहेत सोबत असलेले १२-१४ आमदार ? महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात एक तरी सकारात्मक निर्णय घेतलेला मला सान्गा . सीमा भागातील मराठी बांधवांसोबत आम्ही आहोत हे आमच्या नेत्यांनी आधी पण सांगितलेले आहे काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना यांना सीमा भागातील मराठी बांधवांचा पुळका येत असतो , असेही ते म्हणाले .

Protected Content