जामनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील केकत निंभोरा येथे ओशन इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार एडवोकेट कृष्णा बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ओशन इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या चेअरमन लक्ष्मी वायकर, सचिव दिनकर वायकर, संचालक सुनील जोशी, डॉक्टर अशोक जोशी, डॉक्टर प्रशांत पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, सिनेट सदस्य दीपक पाटील, पुखराज डांगी, जिल्हा बँक संचालक नाना राजमल पाटील, सुमित जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
ओशन इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून लहान मुलांना चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशाने डिजिटल क्लासरूम असून या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अनुभवी शिक्षक राहणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.