अमळनेर प्रतिनिधी । सीएए आणि एनआरसीच्या माध्यमातून केंद्र सरकार देशात फुट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी येथे केला. ते येथे संविधान जागर यात्रेच्या निमित्त आयोजित सभेत बोलत होते.
अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित सभेत योगेंद्र यादव यांनी केद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी कपड्यावरून माणूस ओळखतो पण त्यांना तिरंगा दिसत नाही. त्यांना तिरंग्याचा अभिमान नाही याचा खेद वाटतो. ज्यांना स्वातंत्र्य माहीत नाही त्यांना स्वातंत्र्य आंदोलनाचे महत्व कळणार नाही. एनआरसी व एनपीआर म्हणजे काही माहिती सांगू न शकल्यास किंवा चुकल्यास नागरिकांवर संशयाचा ठपका लावण्यात येईल, अशी भीती व्यक्त केली. त्यानंतर तुम्हाला नोटीस देऊन तुमच्याकडे भारतीय असल्याचा पुरावा मागितला जाईल, जन्माचा पुरावा मागितला जाईल. आज अनेक लोक आणू शकत नाहीत आणि अशा लोकांना विदेशी न्यायालयात पाठवण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रतिभा शिंदे, आमदार अनिल पाटील, करीम सालार यांनीही मनोगत व्यक्त केले.