यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत (खरीप) हंगाम भरडधान्य (ज्वारी, मका, बाजरी) खरेदीसाठी नोंदणीस सुरुवात करण्यात आली असून शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी, असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे.
२०२२-२३ वर्षाच्या हंगामात केंद्र शासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत ( खरीप)हंगाम भरडधान्य (ज्वारी ,मका,बाजरी ) खरेदी केंद्र यावल, उपअभिकर्ता संस्था म्हणून दिनांक ४/१०/२०२२ रोजीच्या जिल्हा पणन अधिकारी याचेकडुन प्राप्त झालेल्या ईमेल संदेशानुसार तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत नोंदणी सुरू झालेली आहे. ज्वारी :-२९७०₹
मका :-१९६२₹
बाजरी :-२३५०₹
शासकीय किमान आधारभुत कितमीच्या हमीभावा अनुसार प्रतिक्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे.
यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाव नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन चालु २०२२-२३ खरीप हंगामाचा (ज्वारी / मका/ बाजरी ) या पिकाचा पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला घेऊन संस्थेशी त्वरीत संपर्क करावा असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी केले आहे.
शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार असल्याची ही माहीती देखील सोसायटी चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली. त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी. तसेच बॅक अकाऊंट चालू स्तीतीत तसेच पुर्ण अकी असावे अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते. (नोंदणी अंतीम दिनांक १५/१०/२०२२ पर्यंत, शासकीय सुटीच्या दिवशीही नोंदणी सुरु राहील नोंदणी ठीकाण कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी.लि. कोरपावली ता. यावल, जि.जळगाव असे आहे शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी.