गादीवर मेणबत्ती पडल्याने सावखेडा येथे घराला आग

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा येथे गादीवर मेणबत्ती पडल्याने एका घरास आग लागली. मात्र याला विझवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत वृत्त असे की, सावखेडा येथील आठवडे बाजारातील मुसा दगडू तडवी यांचे घरातील गादीवर पेटती मेणबत्ती पडल्याने आग लागली. यामध्ये फ्रिज, कुलर, टीव्ही तसेच सहा ते सात क्विंटल धान्य यासह सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने गॅस हंडी चा स्फोट झाला नाही अन्यथा फार मोठा अनर्थ घडला. दरम्यान, आग विझवण्यासाठी घरातील महिला फिरोज तडवी तिने प्रयत्न केले असता तिचे पायाला आगीची आस लागली त्यात ती जखमी झाली आहे. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, हवलदार महेबुब तडवी, सुशिल भुसे, शामकांत धनगर , जगन्नाथ पाटील, अलिम शेख जकिर शेख, होमगार्ड जनार्दन महाजन, तलाठी व्ही. के. नागरे व मिसाळ यांनी पंचनामा केला. तर पं.स. सदस्य शेखर पाटील, सरपंच सकिर तडवी, पोलीस पाटील पंकज बड गुजर, समीर पाटील, नत्थु पाटील, उमा तडवी, सुभेदार तडवी, जम्मा तडवी आदींनी भेटी देवून घेतले आग विझविण्यासाठी गावकर्‍यांनी प्रयत्न केले.

सावखेडा येथे गेल्या दहा दिवसांपासून गावात वीज डीप्या वारंवार घडत असल्याने लाईट नव्हती परिणामी प्रत्येकाच्या घरात मेणबत्ती चे दिवे लागले होते. मुसा तडवी हेदेखील घरात मेणबत्ती लाऊन कुटुंबियांसह घराबाहेर झोपले होते मात्र मेणबत्ती गादीवर पडल्याने अन तरुणाने पेट घेतला आणि घरात भडका झाला. यामुळे येतील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

Add Comment

Protected Content