पाचोरा, प्रतिनिधी । कृष्णापुरी माळी समाजातर्फे प्रती पंढरपूर पाचोरा येथील पांचाळेश्वर नगर कोंडवाडा गल्ली येथे आषाढी एकादशी निमित्ताने फराळ, केळी, पेढे यांचे वाटप करण्यात आले आहे.
श्री. संत शिरोमणी सावता महाराज, पांडुरंग माऊली श्री. विठ्ठल रूख्मीणी मंदिर माळी समाज कार्यालयात महा आरती करून मुर्तींचे पुजन केले. सर्व भाविक भक्त “हिंदू मुस्लिम शिख ईसाई हम सब भाई भाई” हा राम रहीम एकतेचा विचार डोळ्या समोर ठेवून फराळ, केळी पेढे वाटप करून उपक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जगत गुरु संत श्री. तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती पाचोरा अध्यक्ष अनिल मराठे, नाभिक समाज मार्गदर्शक ह. भ. प. रतन अहिरे माळी, समाज सचिव गजानन महाजन, मधुकर महाजन, भाऊसाहेब महाजन, नाना महाजन, प्रमोद महाजन, सचिन महाजन, गुलाब महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन यांनी केले.