कृषी पदवीधर संघटनेच्या जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी फकिरचंद पाटील

पाचोरा, प्रतिनिधी  ।  गिरड येथील फकिरचंद पाटील यांची कृषि पदवीधर संघटनेच्या जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. ते स्व. आर. एस. बाफना कृषी तंत्र विद्यालय, कोल्हे ता .पाचोरा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

कृषि पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण महेश पाटील व कृषि पदवीधर संघटनेच्या अध्यक्षा मंगल पाटील यांनी फकिरचंद पाटील यांची जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी निवड केली. तसेच राज्याचे प्रदेश अध्यक्ष सुरज खोमणे, प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी आघाडी मनिष भदाणे, कार्याध्यक्ष युवक उत्तर महाराष्ट्र प्रदेश राहुल राजपुत यांनी निवडी बद्दल अभिनंदन केले आहे. तसेस पाचोरा – भडगाव तालुक्यासह परिसरातून अभिनंदन होत आहे.  कृषि पदवीधर संघटनेने जी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी चोखपणे पार पाडेल व ह्यापुढे स्वयंसेवेने जळगाव जिल्ह्यातील पदवीधर युवक, विद्यार्थी तसेच शेतकरी कृषी क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेईल असे जळगाव जिल्हा कृषी पदवीधर संघटनेचे युवक कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फकिरचंद पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

 

Protected Content