Home Cities जळगाव सामाजिक बांधिलकी जोपासून आदर्श शिक्षकाने साजरा केला वाढदिवस

सामाजिक बांधिलकी जोपासून आदर्श शिक्षकाने साजरा केला वाढदिवस

0
101


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील उपक्रमशील कला व  आदर्श शिक्षक सुनिल दाभाडे यांनी आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून मानवतेचा संदेश देवून समाजापुढे एक आदर्श निमार्ण केला आहे.

 

शहरातील मानव सेवा विद्यालय येथिल कला शिक्षक,आदर्श शिक्षक पुरस्कृत, Guinness world record व OMG book of record पुरस्कृत,सुनिल दाभाडे सर,यांनी मानवतेचा संदेश देवून वाढदिवस साजरा केला.  मोठमोठ्या पार्टी, बँड, डीजे, ,हॉटेल आदी पद्धतींचा अवलंब करून वाढदिवस साजरा न करता गोरगरिबांच्या साथ घेऊन मिळुन मिसळुन जणू आपुलकीने लेकराप्रमाणे चिमुकल्या बाळांसोबत केक कापुन खाऊ वाटप करुन त्यांच्यात गप्पागोष्टी परिवाराप्रमाणे एक आंगळावेगळा वाढदिवस साजरा  केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस.डाकलिया ,सर्व पदाधिकारी ,सदस्य , प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका माया अंबटकर , माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, शिशु विभाग मुख्याध्यापिका मुक्ता पाटील व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी, जनमतचे अध्यक्ष पंकज नाले , डॉ. ए. पी.जे. पुस्तक भिशीचे अध्यक्ष विजय लुल्हे , ग्रामपंचायत महाळपुरचे सदस्य सागर दाभाडे, अजित चौधरी, गोविदा लोखंडे ,गणेश लोडे ,प्राथमिक पतपेढी चे अध्यक्ष कैलास तायडे, निखिल जोगी आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound