फैजपूर येथे ‘थेंब अमृताचा’ अभियानांतर्गत धाडी नदी खोलीकरणास प्रारंभ

9e2c8688 f258 4f95 848b c9107d382332

फैजपूर (प्रतिनिधी) गेल्या एक महिन्यापासून यावल, रावेर तालुक्यांमध्ये ‘थेंब अमृताचा’ या अभियानांतर्गत अनेक नाले नद्या यांमध्ये लोकसहभागातून कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत आज येथील सावदा रस्त्यालगत असलेल्या धाडी नदीच्या खोलीकरणाचे काम आज सुरू करण्यात आले. या अभियानाला अनेक सामाजिक संघटना, नागरी, डॉक्टर व राजकीय यांचे पाठबळ तसेच या परिसरातील संतमहंत यांचे आशीर्वाद लाभले असल्याने हे अभियान गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे.

 

धाडी नदीच्या खोलीकरण शुभारंभप्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, महंत भक्तीकिशोर दासजी महाराज, भक्तीप्रकाश दासजी महाराज, महंत मानेकरबाबा यांच्याहस्ते पुजन करुन व श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी फैजपूर पालिका गटनेते मिलींद वाघुळदे, जिल्हा दुध संघ संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी नगरसेवक संजय महाजन, भाजपा शहराध्यक्ष संजय रल, ता.उपाध्यक्षा संगिता चौधरी, दिपाली चौधरी झोपे, अनंता नेहेते, रविंद्र होले, जितेंद्र भारंबे, राजू महाजन, पप्पू चौधरी, नमो सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, किरण वाघुळदे, संदीप भारंबे तसेच विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावल, रावेर तालुक्यात भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी परिसरातील सर्व स्तरांतील जनतेने तसेच तरुण वर्गाने स्वयंस्फुर्तीने ‘थेंब अमृताचा’ जलक्रांती अभियानात सहभागी होऊन आपला परिसर पाणीदार करण्यास हातभार लावावा, असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, श्री. भक्ती किशोरदासजी महाराज, तसेच सर्व संत महंतांनी केले आहे.

Add Comment

Protected Content