पहूर, ता.जामनेर । येथील कै.कृषी पंडित मोहनलालजी लोढा यांच्या स्मरणार्थ येथील कृषि पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फ आज सरस्वती अभ्यासिका वाचनालय येथे पहूरसह पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फे समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतुने आज एका छोटेखानी कार्यक्रणाचे आयोजन येथील कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेतर्फ करण्यात आले. यावेळी माजी जि. प. कृषी सभापती प्रदिप लोढा, माजी जि. प.सदस्य कैलास पाटील, प्रल्हाद वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुका युवक अध्यक्ष शैलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात पहूर सह परिसरातील सरस्वती अभ्यासिका वाचनालयातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस , तलाठी , अशा विविध विषयांवरील पुस्तके संस्थेचे व्हा.चेअरमन प्रताप परदेशी, उपसरपंच शाम सावळे, महात्मा फुले पतसंस्थेचे अथ्यक्ष विवेक जाधव, ग्रामपंचायत सदस्य शरदभाऊ पांढरे, रविभाऊ मोरे , ईश्वरभाऊ बारी, चांदखा तडवी, राजू किसन पाटील , आशिष माळी, संस्थेचे कर्मचारी रुंद तसेच दूरध्वनीवरून पहूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी शुभेच्छा दिल्या. माळी समाजाचे अध्यक्ष ज्ञानदेव करवंदे, किरण पाटील, प्रकाश लोढा, विकास लोढा, राजू जंटलमॅन, या सर्वानचे उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा पुस्तके वाटप करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.