जळगाव प्रतिनिधी । भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या भाजीपाला विक्रेता तरूणाची मोटारसायकल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळून लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आशिफ सलीम बागवान (वय-२९) रा. रामनगर शिरसोली नाका हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन उदनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे ते ५ सप्टेंबर राजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी (एमएच १९ सीबी ०५८७) क्रमांकाच्या मोटारसायकलने कृषी उत्पन्न बाजारसमिती भाजीपाला मार्केटमध्ये गेले होते. त्यांनी आपली दुचाकी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ लावली आणि ते भाजीपाला खरेदीसाठी आत गेले. खरेदी झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी आले असता. त्यांना आपली मोटारसायकल याठिकाणी मिळून आली नाही. यावेळी त्यांनी मोटारसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने त्यांना चोरी चोरी झाल्याची खात्री पटली. त्यांनी बुधवारी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रदिप पाटील करीत आहे.