कु . मोहीनी भुगवाडया एमबीबीएस परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

 

 

 

यावल  : प्रतिनिधी  ।  तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम क्षेत्र म्हणुन ओळखले जाणारे वाघझीरा  येथील आदीवासी कुटुंबातील मोहिनी  मालसिंग भुगवाड्या (पावरा)  शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथुन सन २०१६-२०२१ च्या वर्गामधून प्रथम श्रेणीत एम.बी.बी.एस.ची परीक्षा उतीर्ण झाली आहे .

 

कु.मोहिणी यांचे वडील मालसिंग जंगलू भुगवाड्या हे जिल्हा परीषदेच्या नायगाव येथील शाळेत शिक्षक  असुन, आई सौ.नवादी  भुगवाड्या या  किनगाव आरोग्य केंद्राअंतर्गत   मालोद येथील आरोग्य उपकेंन्द्रात परीचारीका  आहेत कु.मोहिणी भुगवाडया यांच्या या यशाबद्दल त्यांचे शाळेतील मुख्याध्यापिका चोपडे , शिक्षक कराळे सर , श्रीमती नावकार  व समाजबांधवांकडून  सर्वत्र कौतुक होत आहे.

 

कु .मोहीनीचे १० विपर्यंतचे  शिक्षण शेगाव (जिल्हा बुलढाणा ) येथील श्री स्वामी विवेकांनद इंग्लीश ज्ञानपीठ स्कुल मध्ये झाले आहे   नंतर १२ विचे शिक्षण श्रीमती मेहेरबानु कॉलेज ऑफ सायन्स अँन्ड कॉर्मस, (अकोला) येथे झाले आहे .

Protected Content