जळगाव, प्रतिनिधी l तालुक्यातील कुसुंबा गावातील १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी जळगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली होती. त्यांच्या मागणीला यश येवून आरोग्य विभागाच्या वतीने या वयोगटातील मुला मुलींच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे.
कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींच्या लसीकरण करण्यात येत आहे. यावेळी ग्रा.प.सदस्य प्रमोद गंगाधर घुगे , प्रा.भाऊसाहेब सोनवणे, जळगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय चव्हाण , डॉ. इरेश पाटील, डॉ.चेतन अग्निहोत्री, डॉ. विकास जोशी, डॉ. जयश्री सोनार, डॉ. सुषमा महाजन, मुख्याध्यापिका दीपाली भदाणे, प्रा.हेमंत सोनार, प्रा.सुनील ढाकणे , सर्व आशा वर्कर व पदाधिकारी उपस्थित होते.