दहशतवादी ‘जैश ए मोहम्मद’ने केली संघासह इतर परिसराची रेकी – गुप्तचर संस्थेने दिला अहवाल

नागपूर वृत्तसंस्था | ‘जैश ए मोहम्मद’ या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनाकडून नागपूर येथील काही संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली असून नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीदेखील यांच्याकडूनही या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे.

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसर यासह इतर काही संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सीकडून पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलीसांनी सुरक्षेचा आढावा घेत तेथील सुरक्षा व्यवस्था मजबूत केली असून याप्रकरणी युएपीए कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पाकिस्तानमधील काहींच्या सांगण्यावरूनच जम्मू-काश्मीरमधील एका तरुणाने जुलै महिन्यात नागपूर येथे दोन दिवस मुक्काम करत काही ठिकाणाची रेकी केली असून त्याला जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सेंट्रल एजन्सीने सर्व माहिती नागपूर पोलीसांना दिली आहे.

Protected Content