जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाचे कारण करून घरासमोरून जणाऱ्या तरूणाला कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. जखमीस रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सुशिल विनोद कोळी (वय-१९) रा. तुळजाईनगर कुसुंबा हा चटई कंपनीत कामाला आहे. शनिवारी ६ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुशिल कामानिमित्त घराच्या बाहेर पडला होता. गावातील प्रशांत सुनिल पाटील (रा.कुसुंबा) याच्या घरासमोरून जात असतांना जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून प्रशांतने त्याच्या घरातून कुऱ्हाड आणुन थेट सुशिलवर हल्ला चढवला. सुशिलच्या पाठीवर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुशिल याला परिसरातील पंकज कोळी व अविनाश पाटील या तरुणांनी सोडवले. यानंतर जखमी सुशिल याला डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सुशिलने दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत पाटील याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संतोष सोनवणे तपास करीत आहेत.