प्रतिबंधित क्षेत्र खुले करण्यासाठी नोडल अधिकारी व नागरिक यांच्यात शाब्दिक चकमक

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुक्त झालेले रूग्ण घरी परतत असतांना निवासस्थानाच्या काही अंतरावर थांबविण्यात आले, प्रतिबंधित क्षेत्र खुले करण्याचा एक ते दीड तासाचा कालावधी लागतो, मात्र शेजारच्या लोकांनी सातत्याने फोन करून महापालिकेच्या अधिकाऱ्यास बेजार केले संबंधित अधिकाऱ्याने अर्वाच्च भाषा वापरले नसल्याचे ठामपणे सांगितले.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील खोटेनगर परिसरातील पांडूरंग नगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. खबरदारी म्हणून घरतील त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात त्यांची पत्नी आणि मुलगा बाधित असल्याचे निष्पन्न झाले. दोघांना २९ मे रोजी जिल्हा कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. जिल्हा कोवीड सेंटरला उपचार घेतल्यानंतर दोघे बरे झाल्याने दोघांना डिस्चार्ज देण्यात आला होता. दोघेजण कोरोना बाधित आढळल्यानंतर तातडीने घर सील करण्यात आले होते. आज सकाळी घरी गेल्यावर देखील महापालिकेचे नोडल अधिकारी श्री. सोनवणी यांना शेजारच्यांनी फोन करून घराला लावलेले सील करण्याची विनंती केली. मात्र यावर श्री. सोनवणी यांनी उद्धटपणे बोलून ‘तुमच्या मुळे कोरोना पसरतोय’ असे सांगितले. कोरोनामुक्त होवून आलेले मायलेक घरासमोर अर्धातास बाहेर थांबून होते. दरम्यान, याच्या पती बरे होवून घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. नोडल अधिकारी सोनवणे यांची उद्धटपणे वागण्यामुळे शेजरी राहणाऱ्या रहिवाश्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान अर्धातासानंतर महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी येवून सील काढण्यात आले.

लाईव्ह ट्रेन्डस न्यूजच्या प्रतिनिधींनी नोडल अधिकारी व्ही.ओ. सोनवणी यांच्या संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित कुटुंबाला व शेजारच्यांना मी सांगितले की, ‘महापालिकेचा कर्मचारी हा घरी आहे, त्याला मी तत्काळ बोलावतो, त्यासाठी अर्धातास लागेल त्यासाठी अर्धा थांबून घ्या’ मी कुठल्याही प्रकारची अर्वाच्च भाषा व उद्धट भाषा वापरली नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Protected Content