जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुसुंबा येथील त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सोमवार दि. ६ सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
त्रिमुर्ती मित्रमंडळ व एस.आर कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ६ सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस महिलांचा मोठ्या संख्यने प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी पारंपारिक व पर्यावरणपूरक सुरेख रांगोळ्या काढल्या. याश्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष निर्मल अनिल पाटील व एस.आर. कॉम्प्युटरच्या संचालिका शबनम शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे यांनी यानी यावेळीकामकाज पाहिले. यावेळी त्रिमुर्ती मंडळाचे सर्व कार्यकर्ते परीसरातील नागरीक पस्थित होते.