जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा गावातील तरूणाची ४० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज संतोष पवार (वय-२५) रा. तुळजाई नगर कुसुंबा ता.जि.जळगाव हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दैनंदिनी कामासाठी (एमएच १९ बीझेड ६७३४) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे ७ जानेवारी रात्री ८ वाजता दुचाकीवरून घरी आले. दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली व जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरसमोर लावलेली ४० हजार रूपये किंमतीची पॅशन प्रो कंपनीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार ८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी शोधाशोध करूनही दुचाकी मिळून आली नाही. १ मार्च रोजी रात्री उशीरा मनोज पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.