पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील ग्रामपंचायतीला गेल्या दोन वर्षांपासून कायम स्वरुपी ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी गावातील घरोघरी जाऊन घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम हाती घेतली आहे. ग्रामसेवक नसल्याने सरपंच, सदस्य व ग्रामस्थांकडुन तीव्र नाराजीचा सूर बघावयास मिळत आहे.
पाचोरा तालुक्यातील कुरंगी – बांबरुड हा जिल्हा परिषदेचा गट असुन मोठ्या लोकसंख्येचे कुरंगी हे गाव आहे. या गावाला गेल्या दोन वर्षांपासून कायम स्वरुपी ग्रामसेवक नसल्याने प्रभारी ग्रामसेवकास कामकाज पाहावे लागत आहे. सन – २०२२ / २०२३ या आर्थिक वर्षाचा मार्च महिना सुरू असुन महिना संपण्यास अवघे काहीच दिवस बाकी असतानाच गावाच्या सार्वांगिन विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सरपंच गणेश पाटील, सदस्य योगेश पाटील, नागराज पाटील, पंढरीनाथ पाटील, दिनकर सोनवणे, शालिक पाटील, अविनाश कोळी, शिपाई बापु पाटील, आण्णा पाटील, दत्तु कोळी हे पथक गावातील घरोघरी जाऊन थकबाकी असलेली घरपट्टी व पाणीपट्टी ची वसुली करत असतांना दिसुन येत आहे.