रावेर प्रतिनिधी । शेतक-यांची महत्वाकांक्षी योजना ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ संदर्भात काम करण्यास रावेर तालुक्यातील तलाठ्याचा स्पष्ट नकार दिला आहे. या योजनेमुळे अतिरीक्त कामाचा ताण वाढत असल्यामुळे तलाठी यांनी नकार देवून, यासंदर्भातील निवेदन तहसिल प्रशासनाला दिले आहे.
तालुक्यातील तलाठी यांनी तहसिल प्रशासनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ योजना कृषी खातेशी संबधीत असुन ती बळजबरीने महसूल विभागाकडे सोपवली आहे. आतापर्यत आशा अनेक योजना महसुल विभागाचा संबंध नसतांना महसुल विभागावर लादण्यात आल्या आहे. पीएम किसान योजना राबवताना तलाठयांच्या मुळ कामावर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे. तसेच सदर योजना ही नेहमी सुरु राहणार असल्याने तलाठी यांचेवर अतिरीक्त कामाचा ताण वाढणार असल्याचे निवेदनावर तलाठयांनी म्हटले आहे.
योजने संदर्भात अस्या आहे समस्या
प्रधामंत्री किसान सम्मान योजने संदर्भात अनेक शेतक-यांची आधार कार्डवरील चुकलेले नावे, बँक अकाउंटचा चुकलेला नंबर, आयएएफसीचा चुकलेला कोड या कारणांमुळे योजनेचा लाभ शेतक-यांना देण्यात अडचणी येत आहेत. आता पर्यंत तालुक्यातील 41%टक्के शेतकऱ्यांच्या बँक समस्या संदर्भात तर 49% टक्के शेतक-यांची आधार संदर्भात समस्या सोडल्या आहे. तसेच शेतकऱ्यांमधून संथगतीने सुरु असलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली.