किरेन रिजीजू यांना कायदामंत्री पदावरून हटविले

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरेन रिचीजू यांना केंद्रीय कायदामंत्री या पदावरून हटविले असून त्यांचा कार्यभार अर्जुनराम मेघवाल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

केंद्रीय मंत्रीमंडळाचा शेवटचा विस्तार होण्याआधीच कॅबिनेटमध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे. यात देशाचे विधी व न्याय मंत्री किरेन रिजीजू यांच्याकडील मंत्रीपदाचा कार्यभार काढण्यात आलेला आहे. तर हे पद अर्जुनराम मेघवाल यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे.

 

रिजीजू यांची अलीकडच्या काळातील काही विधाने ही वादाच्या भोवर्‍यात सापडलेली होती. यात प्रामुख्याने त्यांनी कॉलेजीयम सिस्टीम तसेच न्यायव्यवस्थेवर केलेल्या भाष्यांचा समावेश होता. यामुळे त्यांना या पदावरून कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्याकड ेदुसर्‍या पदाचा कार्यभार मिळणार की त्यांची गच्छंती होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content