किरण मझुमदार शॉ यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान

kiran sho

मुंबई प्रतिनिधी । जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या भारतीय महिला उद्योजक किरण मझुमदार शॉ यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्कार मिळवणाऱ्या किरण मझुमदार शॉ या चौथ्या भारतीय आहेत.

ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त हरिंदर सिद्धू यांनी शॉ यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्काराने सन्मानित केले. शॉ यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापारी संबंध दृढ करण्यात भरीव योगदान दिले आहे. त्यांनी शिक्षण, लिंग समानता आदी क्षेत्रात काम केले आहे. त्यामुळे त्या ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’च्या मानकरी ठरल्याचे हरिंदर सिद्धू यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारी बंगळुरात शॉ यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे शॉ या फेडरेशन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यावर भारतात बायोकॉन या बायो फार्मास्युटिकल कंपनीची स्थापना केली. आज बायोकॉन भारतातील आघाडीची कंपनी आहे. किरण मझुमदार शॉ या फोर्ब्स मासिकाच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिला उद्योजिका आहेत.

Protected Content