किनगाव येथे चिमुकल्यांनी आषाढी एकादशी व गुरुपोर्णिमा केली उत्सहात साजरी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | तालुक्यातील किनगाव येथील अमीर पब्लिक स्कुल इंग्लिश मिडीयम येथे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा सोहळा विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात केला साजरा .

 

अमीर प्रतिष्ठान संचलित अमीर पब्लिक स्कुल(इंग्लिश मीडियम)या शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात दिंडी सोहळा साजरा केला. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका यांनी आयोजीत केलेल्या या दिंडी सोहळयात  स्कूलच्या चिमूकल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक वस्त्र परिधान करून दिंडी पूजन केले. संस्थेचे पदाधिकारी सचिन तडवी यांनी याप्रसंगी आषाढी एकादशीचे महत्व व आषाढी एकादशी का साजरी करावी ? हे चिमुकल्यांना अगदी समजेल अशा सोप्या व सरळ भाष्या शैलीत मार्गदर्शन करीत समजावून सांगितले. आषाढी एकादशी निमित्ताने आयोजीत दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील संस्थेचे पदाधिकारी सचिन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक गणेश मेश्राम , शिक्षीका जयश्री चौधरी, कल्पना तायडे , वैशाली मराठे यांच्यासह स्कुलचे सर्व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

 

Protected Content