पाचोरा शहरात रात्री दोन वाजता रक्तदान करून वाचविले महिलेचे प्राण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महीलेचे मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास रक्तदान करुन वाचविले प्राण या रक्तदात्यांचे कौतुक होत आहे.

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे केव्हा कुणाला रक्ताची गरज पडु शकेल हे सांगणे कठीण आहे. दिवसभर कधीही रक्त मिळणे हे सहज शक्य आहे मात्र अंत्यत दुर्मिळ रक्तगट ओ-निगेटिव्ह आणि तेही रात्रीच्या सुमारास मिळेल याची कधीच श्वासती नसते अशातच भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील छाया गायकवाड ही माता बाळंतपणासाठी येथील लिलावती हॉस्पिटलला मंगळवारी २८ फेब्रुवारी रेाजी सायंकाळी दाखल झाली. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि रुग्णासोबत कुणीही नाही, अशात तिला रक्ताची आणि तोही दुर्मिळ रक्तगटाची गरज पडली. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनापुढे प्रश्न पडला, इतक्या रात्री कुणाशी संपर्क साधला पाहिजे, तेव्हा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी रात्री दिड वाजेच्या सुमारास संपर्क केला असता ते तातडीने हॉस्पिटलमध्ये उपस्थिती होवुन त्यांनी त्यांच्या संपर्कातील कार्यकर्तेंशी संपर्क करुन तात्काळ रात्री २ वाजता सामाजिक कार्यकर्ते सुनिल माळी हे गाढ झोपेत असताना उठून आले आणि रक्तदान केले. रक्तदात्यांच्या रक्ताने छाया गायकवाडचा प्राण डॉ. वैभव सुर्यवंशी वाचवु शकले आणि एका सुखरूप बाळाला तिने जन्म दिला. यावेळी सचिन पाटील, ललित पाटील, शुभम मराठे उपस्थितीत होते. दुसर्‍या दिवशी छाया गायकवाड यांच्या नातेवाईकांनी कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्यासह रक्त दाताची भेट घेऊन आभार मानले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याचा पुन्हा प्रत्यय आला. रक्तदानासाठी कोणतेही वेळ नसते हेही सिद्ध झाले.

Protected Content