किनगाव येथे क्षत्रीय माळी समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कीनगाव येथील श्री क्षत्रिय माळी समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

किनगाव येथील मंगल कार्यालयात क्षत्रीय माळी समाज मंडळाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व गुणीजनांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष सुकलाल महाजन (गुरुजी) हे होते तर कार्यकारणी सदस्य उत्तम रूपचंद महाजन कल्याण येथील प्रसिद्ध मनोजकुमार मोरे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरूवातीला महात्माजी फुले यांच्या प्रतीमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले व म.ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजासाठी केलेला त्याग व त्यातून घडवलेला समाज आणी सद्यस्थितीत असलेला समाज व पुढील दिशा या सर्व पैलूंचे अभ्यास पूर्ण विवेचन मान्यवरांनी केले तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात इ.१० वी इ.१२ वी पदवी व पदव्युत्तर तसेच इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात निवड झालेल्या व्यक्तींना क्षत्रीय माळी समाज मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.

इ.१० वी मध्ये ९५% गुण मिळवून सायली प्रवीण महाजन ९०% गुण मीळवून वैष्णवी बापू माळी ८५% गुण मिळवून शाकंभरी महेंद्र माळी इ.१२ वी मधील विद्यार्थी हिमांशू नरेंद्र महाजन ९०% संध्या गिरीश माळी ८७% तसेच पदव्युत्तर विशाल प्रमोद महाजन एम.सीए विशेष गुणवत्ता श्रेणी या विद्यार्थ्यांसह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र गुलाब पुष्प व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्माजी फुले यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थिनी सायली माळी, हर्षदा माळी व वैष्णवी माळी यांनी यथोचित भाषणे केले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक क्षेत्रीय माळी समाज सेवा मंडळाचे सचिव महेंद्र नारायण माळी यांनी केले व सूत्रसंचालन नरेंद्र महाजन यांनी केले तर आभार बापू माळी सर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सहसचिव महेंद्र छगन माळी कोतवाल खेमचंद माळी युवा कार्यकर्ते रवी माळी, जीवन माळी, निलेश माळी, शुभम माळी यांच्यासह सर्व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content