यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील १५ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. गेल्या तीन महिन्यांपासून बंटी उर्फ महेश एकनाथ वराडे रा. किनगाव ता. यावल जि.जळगाव हा तरूणी अल्पवयीन मुलीला तिच्या आजीच्या फोनवर संपर्क करायला सुरूवात केली. त्यानंतर अल्पवयीन मुलाचा पाठलाग करणे, पळवून नेण्याची धमकी देणे सुरू झाले. यातच रविवारी ११ जुलै रोजी अल्पवयीन मुलगी कामाच्या निमित्तोन बाहेरगावी जात असतांना संशयित आरोपी बंटी वराडे याने तिचा पाठलाग केला. तिच्यासमोर अश्लिल चाळे केले, तू माझ्या सोबत ये तू, नाही आली तर तुला मी पळवून नईल अशी धमकी देवून विनयभंग केला. पिडीत अल्पवयीन मुलीने यावल पोलीसात तक्रार दिली. तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बंटी वराडे याच्या विरोधात रविवारी ११ जुलै रोजी रात्री ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार हे करीत आहे.