फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची बदली

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कैलास कडलग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज महसूल खात्यातील अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. यात फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची बदली झाली आहे. आता ते नगर जिल्ह्यात विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक-३ या पदावर रूजू होणार आहेत. तर त्यांच्या जागी तळोदा येथून बदली होऊन येणारे कैलास कडलग हे कार्यभार सांभाळणार आहेत.

कैलास कडलग यांनी आधी यावल येथील तहसीलदार म्हणून काम केलेले आहे. यामुळे फैजपूरचे प्रांताधिकारी म्हणून काम करतांना त्यांना याचा चांगला लाभ होईल असे मानले जात आहे. तर डॉ. अजित थोरबोले यांची फैजपूर येथील कारकिर्द देखील अतिशय अविस्मरणीय अशीच असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. विशेष करून कोविडच्या कालावधीतील त्यांचे काम हे सर्वांनी वाखाणले आहे.

Protected Content