यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी I तालुक्यातील किनगाव ते दोनगाव या मार्गावरील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आ. लताताई सोनवणे यांच्या स्थानिक विकास निधीतून हे काम होत आहे.
यावल तालुक्यातील किनगाव ते दोनगाव दरम्यानचा मार्ग हा शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा समजला जाणारा रस्ता आहे. मागील अनेक वर्षापासुन ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे होवुन रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली होती . दोनगावच्या नागरीकांनी माजी आमदार प्रा .चंद्रकांत सोनवणे तथा आमदार लताताई सोनवणे यांची भेट घेवुन या रस्त्याबाबतची कैफियत मांडली. ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार लताताई सोनवणे यांनी या चार किलोमिटर लांबी असलेल्या रस्त्याच्या रूंदीकरण , मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी सुमारे ७८ लाख रूपयांचा निधी मंजुर केला असुन , मागील अनेक दिवसापासुन परिसरातील नागरीक सदर रस्त्या दुरूस्तीचे कार्य कधी होणार अशा कामाच्या प्रतिक्षेत होते व अखेर या रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आल्याने परिसरातील विद्यार्थी पालक , शेतकरी व ग्रामस्थांनांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदरचा रस्ता हा शासनाच्या निविदा प्रमाणे मजबुत गुणवत्तेच्या निकषानुसार होईल अशी अपेक्षा ही नागरीक व्यक्त करीत आहे .