किनगाव इंग्लीश स्कूल येथे मैदानी स्पर्धा उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रोडवरील इंग्लिश मेडियम निवासिक पब्लिक स्कूल येथे दि.२५ रोजी सुरू झालेल्या मुलींच्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या.

स्कुलच्या भव्य मैदानावर संपन्न झालेल्या किनगाव इंग्लिश मेडीयम पब्लिक स्कुलच्या विद्यार्थिनी नेहा जेधा बारेला २०० मिटर रनिंग रेस मध्ये द्वितीय आणि निशा पाटील हीने थाळी फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला या स्पर्धांचे उद्घाटन इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव व व्यंकटेश बालाजी संचलित व्ही.मार्ट किनगाव चे संचालक मनीष विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एम.डी.शिकोगार नेहरू विद्यालय किनगाव, भा.की.चौधरी, दिवाकर चौधरी विद्यालय डांभुर्णी, अश्विनी वाय.कोळी भारत विद्यालय न्हावी, वाय.ए.सपकाळे सार्वजनिक विद्यालय चिंचोली, व्ही.व्ही.राजपूत जे.टी. महाजन इंग्लिश मेडियम स्कूल न्हावी मार्गे फैजपूर, स्वाती ए.परदेशी फैजपूर, प्रवीण एन. चौधरी सेमी इंग्लिश मेडियम स्कूल फैजपूर, ज्योती एल.बोरोले फैजपूर, वाय.जी.कोळी प्रभात विद्यालय हिंगोणे, व्ही व्ही राजपुत, जे.टी महाजन इंग्लिश मिडीयम स्कुल न्हावी, ए.एस. काळकर, चौधरी विद्यालय अकलूज, व्ही.एस.महाजन कुसुमताई माध्यमिक विद्यालय फैजपूर, एस.व्ही.पाटील माध्यमिक विद्यालय वड्री, शेख सलीम जलालुद्दीन इंदिरा गांधी स्कूल यावल, जितेंद्र अर्जुन फिरके डि.के.सी. विद्यालय डांभुर्णी, स्वाती ए . परदेशी फैजपुर व प्रवीण एन चौधरी, सेमी इंग्लीश मेडीयम स्कुल फैजपुर, निळकंठ चोरदास पाटील घनःशाम काशीराम विद्यालय आमोदे व तालुक्यातील आदी शाळांचे क्रिडा शिक्षक मोठया संख्येत या स्पर्धत उपस्थीत होते.या कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंग्लिश मेडीयम पब्लिकस्कुल किनगाव यांनी परिश्रम घेतले.

Protected Content