कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी)। येथील भारती विद्या मंदीर शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून कार्तिक राजेंद्र ठाकरे हा केंद्रातून ९३.४० टक्के गुण मिळून प्रथम आला आहे.
सन २०१९-२०२० वर्षाच्या शैक्षणिक वर्षात झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत भारती विद्यामंदिर शाळेत एकूण ५७ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले असून शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. कार्तिक राजेंद्र ठाकरे याला ९३.४० टक्के गुण मिळवून प्रथम तर मयूर संजय चौधरी ८९.९० टक्के मिळून द्वितीय क्रमांक मिळविला तर ८८.६० टक्के गुण मिळवून सायली सुदाम वाघ हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. एकूण ५७ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन शरदराव शिंदे, मुख्याध्यापिका वंदना चौधरी, माध्यमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कुलदीप पवार सर्व शिक्षक वृंदतर्फे अभिनंदन केले आहे. भावी वाटचालीस सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात.