काश्मीरात चकमक : कर्नल व मेजरसह पाच जवान शहीद

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काश्मिरातील कुपवाडा जिल्ह्यातील हंडवाडा परिसरात दहशतवादी व सुरक्षा यंत्रणांमध्ये आज झालेल्या जोरदार चकमकीत पाच जवान शहीद झाले असून यात एक कर्नल व मेजरचा समावेश आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांशी जवानांची चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकार्‍यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्‍चक्री सुरु होती.
शहीदांमध्ये २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे.

दहशतवादी घुसलेल्या भागात राहणार्‍या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे ५ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांची टीमने इथं प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. यानंतर त्यांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content