काशिनाथ पलोड शाळेत ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड स्कूलमध्ये  भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य वाचन प्रेरणा दिन शाळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी इयत्ता आठवीचे विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया  माध्यमिक विभागाच्या  समन्वयिका  संगीता तळेले प्राथमिक विभागाच्या समन्वयिका स्वाती अहिरराव यांच्या हस्ते सरस्वती पूजन व अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हर्षित केसवानी याने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची माहिती सांगून त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून का साजरी केली जाते हे सांगून वाचनाचे महत्त्व सांगितले. तर दिव्यांशी पात्रा, स्वयम् पाटील यांनी पुस्तक परीक्षण सादर केले. तसेच वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जळगावातील प्रसिद्ध वक्ते मनोज गोविंदवार यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. 

या मुलाखतीतून गोविंदवार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सुरुवात कशी करावी,काय वाचावे,कसे वाचावे, जीवन जगत असताना आपण वाचलेले साहित्य कसे मार्गदर्शक, दिशा दर्शक ठरते याविषयी मार्गदर्शन केले,. यानंतर शाळेचे शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वाचनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती वाणी तर आभार प्रदर्शन आदित्य शर्मा या विद्यार्थ्यांनी केले. 

या कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत सोनवणे, मंजुषा भिडे, भारती माळी अमर जंगले यांनी केले होते. तर कार्यक्रमाची तांत्रिक बाजू निलेश बडगुजर अनिरुद्ध डावरे यांनी सांभाळली. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content