काव्यरत्नावली चौक ते डी-मार्ट रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची महापौरांकडून पाहणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. काव्यरत्नावली चौक ते डी-मार्ट दरम्यानच्या रस्त्यांचे डांबरीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. मंगळवारी १७ जानेवारी दुपारी ३ वाजता महापौर जयश्री महाजन यांनी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना योग्य कामांसंदर्भात सुचना दिल्यात.

जळगाव शहरातील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम जळगाव महापालिकेने हाती घेतले आहे. राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर लगेचच कामाला सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जळगावकर आणि वाहनधारकांना रस्त्यांच्या त्रासांपासून अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या संदर्भात महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने व तक्रारी केल्या जात होत्या. प्रशासनाकडून नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या वतीने ठेकेदाराला कामाची निविदा काढून गेल्या महिन्यांपासून रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. याच अनुषंगाने मंगळवारी १७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता काव्यरत्नावली चौक ते डी-मार्ट दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. महापौर जयश्री महाजन यांनी दुपारी ३ वाजता डांबरीकरणाच्या रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता चेक करून पाहणी केली तसेच संबंधित ठेकेदाराला योग्य त्या सूचना देण्यात आले आहे.

Protected Content