जळगाव प्रतिनिधी । जळगाव-औरंगाबाद महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने वीजेच्या खंब्याला धडक दिली होती. यात चारचाकीतीन दोन जण जखमी झाले होती. जखमीतील एका तरूणाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव-औरंगाबाद महामार्गावर १ जुलै रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अजिंठा रोडवरील राका फर्निचर जवळील एलटी लाईन वीज पोलला भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडी क्रमांक (एमएच ०२ बीजी ३०७८)ने धडक दिल्याने चारचाकीतील चालक ज्ञानेश्वर एम. चव्हाण (वय २० सुप्रीम कॉलनी) व प्रशांत प्रकाश नायर (वय २३ अयोध्यानगर) हे दोन्ही जखमी होते. या अपघातात चारचाकीने चारवेळा पलटी घेतली होती. यातील प्रशांत नायर या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोकॉ अतुल पाटील करीत आहे.